Website:
Paste Title:
Colors
Sizes
1
2
3
4
5
6
7
मुंबईतील अतिरेक्यांच्या हल्ल्यांनंतर ब्लॉगर्स आणि सर्वसामान्य नागरिक यांनी माहिती देण्यासाठी आणि मदतीच्या याचनेसाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केलेला दिसून आला. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सेवेवर Mumbai आणि #Mumbai या टॅगवर काल रात्रीपासून हजारो अपडेट्स दिली गेली. यात ताज्या घडामोडी, मृत आणि जखमींची संख्या, रक्तदानासंबंधीची आवाहने, हॉस्पीटल्स, हॉटेल्सचे हेल्पलाईन क्रमांक आदी माहितीचा समावेश होता. आज सकाळपासून @mumbaiattack अशा नावाने स्वतंत्र ट्विटर अकाऊंटही सुरू झाले आहे. www.twitter.com महालो आणि नाऊ पब्लिक या सिटीजन जर्नलिझम साईटवर नागरिकांनी लिहिलेल्या बातम्यांचा समावेश आहे. नाऊ पब्लिकच्या होम पेजवर हल्ल्याशी संबंधित बातम्या, छायाचित्रे आणि व्हिडीओ आहेत. http://www.mahalo.com/Mumbai_Terrorist_Attacks http://www.nowpublic.com/ मुंबई हेल्प या ब्लॉगवर कॅन वुई हेल्प या नावाने सुरू झालेल्या पोस्टवर मुंबईकरांची मदतीची भावना दिसून येते. ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांशी संपर्क साधण्यात ते मदत करत होते. नरिमन हाऊसमध्ये ओलिस ठेवलेल्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या इसराईलमधील नातेवाईकांनी या ब्लॉगचा आधार घेतला. http://mumbaihelp.blogspot.com विनूकुमार रंगनाथन हा कुलाब्यात राहणारा तरुण पहिल्या बातमीनंतर केवळ १५ मिनिटात घटनास्थळी पोचला. त्याने काढलेली छायाचित्रे फ्लिकरवर अपलोड केली. फॉक्स न्यूजने मुंबई हल्ल्याशी संबंधित बातमीत विनूकुमारच्या फ्लिकरवरील फोटोस्ट्रीमची लिंक दिली आहे. http://flickr.com/photos/vinu/ ग्लोबल व्हॉईसेस अॉनलाईन या साईटवर नेहा विश्वनाथनने हल्ल्यासंबंधित बातम्यांची मालिका सुरू केली आहे. http://globalvoicesonline.org/
Paste Options
+
Make Private
Password
Prune After
Never
30 minutes
1 hour
3 hours
1 day
3 days
1 week
3 weeks
1 month
3 months
Code?
No
Yes